१०० दिवसंच काय १०० महिने जरी लागले तरी मी आंदोलक शेतकऱ्यांसोबत उभी राहील – प्रियांका गांधी

प्रियांका गांधी

नवी दिल्ली – केंद्र शासनाने कृषी कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून दिल्ली येथे सुरू आलेल्या शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात शेतकरी आंदोलनाला व्यापक समर्थनही मिळाले. काही अंशी या आंदोलनाला अप्रत्यक्षरीत्या विरोधही होत आहे.

आशा गमावू नका, १०० दिवस झाले आहेत. १०० आठवडे किंवा १०० महिने जरी लागले तरी जोपर्यंत सरकार हे काळे कायदे परत घेत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा तुमच्या साथीने सुरूच ठेवणार आहोत,असे आश्‍वासन कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज दिले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास आता १०० दिवस उलटल्यानंतरही अद्याप हे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून, केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे त्यांना मान्य नसून, ते रद्द करण्याची त्यांची मागणी कायम आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रिये मुळे आंदोलक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे मानण्यात येत आहे.

शेतकरी १०० दिवसांपासून संघर्ष करत आहेत. ३०० पेक्षा अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. शेतकऱ्यांकडे जाऊन चर्चा करणे हे सरकारचे कर्तव्य होते. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या बलिदानाची थट्टा केली, शेतकऱ्यांचा अपमान केला. मी वचन देते की १०० दिवसंच काय १०० महिने जरी लागले तरी देखी मी शेतकऱ्यांसोबत उभी राहील. असे त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या –