शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशांनाही झुकावं लागलं होतं, त्यामुळे हे आंदोलन काही कायदे रद्द झाल्याशिवाय संपणारं नाही

नवी दिल्ली – गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसंच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.

यादरम्यान भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला असून, भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा दिला आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना याचे पडसाद संसदेत देखील उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन सरकावर हल्ला चढवला.

गुलाम नबी आझाद म्हणाले, शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशांनाही झुकावं लागलं होतं. त्यामुळे हे आंदोलन काही कायदे रद्द झाल्याशिवाय संपणारं नाही. सरकारने कृषी कायदे मागे घ्यायला हवेत. शेतकऱ्यांशिवाय या देशाचं काहीच होऊ शकत नाही.

सरकारला शेतकऱ्यांविरोधात नव्हे, तर कोरोना आणि चीन विरुद्ध लढण्याची गरज आहे. देशासाठी जवान आणि किसान हे दोन्ही महत्वाचे आहेत, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –