अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान; पंचनामे करून मदत देण्याची मागणी

शेतकरी

जालना – जिल्ह्यात आधीच कोरोनाच्या कहरमुळे त्रस्त असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या फळबागा व पिकांचे नुकसान तसेच मुकी जनावरे दगावून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना प्रशासन बघ्याची भूमिका बजावत आहे. शेतकरी वर्ग नुकसान भरपाई मिळावी म्हणून ओरड करीत आहे, मात्र याकडे अधिकारी वर्गासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

बदनापूर तालुक्यासह जालना जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षांपासून सतत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे पिके वाया जात आहेत, तर अवकाळी पावसात विजा पडून मुक्या जनावरांना जीव गमवावा लागत आहे, शेतकरी दरवर्षी बँका, सोसायट्या व खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन पिकांची लागवड करतात.

१५ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या बदनापूर तालुक्यातील पीरसावंगी या गावी मनसेच्या वतीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची व फळबागांची पाहणी करण्यात आली. कांदा, मोसंबी, आंबा, डाळिंब, सीताफळ, चिंच, उन्हाळी बाजरी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून रोख रकमेत शेतकऱ्यांना मदत करावी.

महत्वाच्या बातम्या –