गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी

गारपीट

जालना – भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यात गुरुवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी आमदार संतोष दानवे यांनी केली. दानवे यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष बांदावर जाऊन पाहनी केली. तसेच वस्तुनिष्ट पंचनामे करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी शासनास तातडीने अहवाल सादर करण्याच्या सुचना आमदार संतोष पाटील दानवे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

भोकरदन तालुक्यातील मुठाड, इब्राहीपूर, तांदुळवाडी, नांजा, क्षीरसागर, मासनपूर, जोमाळा, मालखेडा, सुभानपूरसह जाफ्राबाद तालुक्यात गुरुवारी मोठ्याप्रणात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी व कांदा या सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फलोत्पादक शेतकऱ्यांते देखील या पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डाळींब व पपई सारख्या फळपिकं शेतकऱ्यांच्या हातातून गेली. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी आमदार संतोष दानवे यांनी केली आहे.

दरम्यान गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असुन जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यसरकारला धारेवर धरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संतोष दानवे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –