शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता; राज्यात आजही पावसाचा इशारा

पाऊस

नांदेड – मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या वादळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहेत. हातातोंडाशी आलेला रब्बी पीकांचा घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाचा फटका सर्वाधिक हरभरा पिकांना बसला आहे.

बुधवारी रात्रीपासून अर्धापुर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने अचानक हजेरी लावली.  या पावसात टरबूज, हरभरा पिकांचे नुकसान झाले. त्यात गुरुवारी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आसुन हरभऱ्याची काढणी काढायला घेतले आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांनीही हळद काढणी सुरु केली आहे. सध्याही परिसरात ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

तर नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात झालेल्या जोरदार पावसाने हरभरा, गहू, ज्वारीचे आतोनात नुकसान झाले. येथील शेतकऱ्यांनी वाळण्यासाठी टाकलेला होता, त्यात पाऊस पडल्याने नुकसान झाले आहे. माहूर तालुक्यात गारपीट झाल्याने कापून ठेवलेल्या हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशी उपटून हरभरा पीक घेतले. मात्र पावसामुळे तेही वाया जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने शुक्रवारी वादळी पावसाचा आंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –