मुंबई – गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात ऐन हिवाळ्यात थंडी गायब झाल्याने शेतकऱ्यांनी घेतलेल्या रब्बी पिकांना धोका निअर्मान झाला होता. मात्र आठवड्या पासून पुन्हा थंडी पडल्याने शेतकरी काहीसा सुखावलं असतानाच पुन्हा एकदा आसमानी संकटाची चाहूल लागली आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढच्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक राज्यांत कडाक्याची थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर आता मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणातही बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पिकांना धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सध्या कोकणात आंबा आणि काजू पिकासाठी तर इतरत्र गहू या मुख्य पिकासाठी पोषक वातावरण आहे. मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- कृषी कायद्यावरून शरद पवार यांनी मोदी सरकारला केलं ‘हे’ मोठं आवाहन
- ‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या
- मोठी बातमी – दिल्लीतील शेतकरी आंदोलनात १८ पोलीस जखमी तर एकाची प्रकृती गंभीर
- शेतकऱ्याने लढवलेली शक्कल, मजूर टंचाईवर रामबाण उपाय