राज्यातील ‘या’ लहानशा गावातील शेतकऱ्यांनी शेतात पिकवला विदेशी काळा ऊस

काळा ऊस

वाशिमः महाराष्ट्रात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील अनेक शेतकरी ऊस लागवड करतात. राज्यातील पश्चिम आणि विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जाते. राज्यात यंदा मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली आहे, राज्यात मागील वर्षी १९० साखर कारखाने सुरु झाले होते तर यंदा राज्यात तब्बल १९४ साखर कारखाने सुरु झाले आहे. तर यात राज्यातील सोलापूर भागात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे.

तर राज्यातील वाशीम शहरात एक गाव आहे जिथे विदेशी काळ्या रंगाच्या उसाची लागवड केली जाते.  राज्यातील वाशीम शहरापासुन थोडेसे लांब म्हणजेच ५ कि.मी अंतरावर असलेलं मौजे काटा हे  गाव आहे जिथे काळ्या ऊसाची (Black cane) लागवड केली जाते. महाराष्ट्रात हे गाव काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी खूप जास्त प्रसिध्द आहे.

महाराष्ट्रात हे गाव काळ्या ऊसाच्या(Black cane)  लागवडीसाठी  प्रसिध्द असलेल्या या गावात उत्पादन घेत असलेल्या काळ्या ऊसाची सर्वत्र चर्चा आहे. विदर्भात  असलेलं  मौजे काटा हे गाव संपूर्ण विदर्भात नव्हे नव्हे तर राज्यात ऊस लागवडीसाठी ओळखले जाते, १८ व्या शतकात मुंबईचे शिल्पकार म्हणून ख्याती असलेले जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांनी विदेशातून काळा ऊस आणला होता. नाना शंकर शेठ यांनी खास मॉरिशस या देशातुन काळ्या ऊसाचे वाण आणले होते. कालंतराने तेच वाण काटा या गावातील तत्कालिन शेतकऱ्यांनी मिळवुन ऊस शेती करायला सुरूवात केली. म्हणुनच या ऊसाला मॉरीशियस ऊस असे देखील म्हटले जाते.

महाराष्ट्रसह , मध्यप्रदेश, तेलंगणा आणि गुजरात या काळ्या ऊसाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हा काळा ऊस  आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे म्हणून या काळ्या ऊसाला मोतज्ञ प्रमाणात अनेक राज्यातून मागली मिळत आहे. वाशीम शहरातील मौजे काटा या गावांत मोठ्या प्रमाणात काळया ऊसाची लागवड होते. काटयाच्या सुपीक जमीनीत पिकणारा हा काळा ऊस येथील हजारो कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि समृध्दीचा प्रकाश फुलवीत आहे. करणं या काळ्या ऊसाला मोठ्या प्रमाणात मागणी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.

वाशीम शहरातील मौजे काटा  गावातील शेतकऱ्यांना यातून चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे या काळ्या ऊसाला काळा  बारामही मागणी मिळत आहे त्यामुळे अनेक शेतकरी या काळ्या उसाची लागवड करत आहे.

महत्वाच्या बातम्या –