पैठणच्या शेतकऱ्यांने एका एकरात टरबूज पिकाचे घेतले तब्ब्ल २० टन उत्पन्न; टरबूज थेट पाठविले दिल्लीला

टरबूज

औरंगाबाद – पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे पारंपारिक पिका न घेता शेतात एक एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड करत, कोरोना काळात देखील तब्बल सुमारे दीड लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगले पिक घेऊन ते बाजारपेठेत त्याला चांगले भाव मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विहामांडवा ता,पैठण येथिल रऊफ शेख यांनी आपल्या शेतात एक एकर क्षेत्रावर टरबूज या पिकाची लागवड केली.मॅक्स जातीच्या टरबूज पिकाचे एका एकरात २० टन उत्पन्न घेऊन शेतकरी वर्गासमोर त्यांनी नवी संकल्पना आणली आहे. या भागात प्रामुख्याने ऊस , गह , ऊस , मका ही पारंपरिक पिके घेण्यावरच शेतकरी वर्गाचा कल असतो, मात्र रऊफ शेख यांनी टरबुजाची लागवड करीत भरघोस उत्पन्न घेतले.

त्यांनी सहा बाय दीड फूट अंतरावर सरी तयार करून त्यावर ड्रीप, शेणखत टाकून पूर्वतयारी केल्यानंतर त्यावर उच्च प्रतीच्या टरबुजाची लागवड केली . सर्व तयारी करीत असताना त्यांनी रासायनिक खताचा अतिरेक टाळून सेंद्रिय खताला प्राधान्य दिले . तसेच कीटकनाशकांचा वापर न करता जैविक औषधांचा वापर केला . यामुळे खर्चात जवळजवळ ४० टक्क्यांनी बचत झाल्याचे ते सांगतात .

रऊफ शेख यांनी व्यापाऱ्यांच्या मदतीने हे टरबूज थेट दिल्लीला पाठविले असून पारंपरिक पिके घेऊन आर्थिक उत्पन्न टिकवून ठेवणे हे शेतकरी वर्गाचे गणित असते. मात्र,आजच्या तरुणाईला ही गणिते न पटणारी आहेत. शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या –