‘या’ जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी परत करावा लागणार

शेतकरी

बीड – केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा मिळणारा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी अर्ज केले. यात आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट आहे. तरीही अनेकांनी रक्कम पदरात पाडून घेतली. मात्र, आता त्यांचे पितळ उघड पडले असून त्यांच्या खात्यात वर्ग झालेली ही रक्कम वसुलीची मोहीम सुरू झाली आहे. यामुळे आता बीड जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी परत करावा लागणार आहे.

योजनेतंर्गत बीड जिल्ह्यात ५ लाख २२ हजार लाभार्थींची नोंद करण्यात आली आहे. यानूसार लाभार्थी शेतकऱ्यांन ३ हफ्त्यात प्रत्येकी २ हजार या प्रमाणे ६ हजार रुपये देण्यात येतात. दरम्यान, सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींची डाटा केंद्रिय आयकर विभागाच्या माहितीशी संलग्न करण्यात आला आहे. यातून बीड जिल्ह्यातील ७ हजार १७८ लाभार्थी हे आयकर भरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे हे अपात्र ठरलेत. तसेच २० हजार ८०४ लाभार्थी हे विविध कारणांनी अपात्र ठरलेत.
या सर्व बोगस लाभार्थींकडून १९ कोटी १० लाख ८ हजार रुपये वसुली करण्यात येणारे. त्यापैकी १ कोटी ९९ लाख १२ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित अपात्र शेतकऱ्यांना नोटीस देऊन रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरुये. संबधित शेतकऱ्यांनी सन्मान निधी योजनेची रक्कम परत करावी असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

महसूल विभागामार्फत मोठी यंत्रणा राबविण्यात येत असून गावोगावी जाऊन अशा अपात्र लाभार्थ्यांना मिळालेला निधी परत करण्याचे नोटीस देण्यात येत आहे. देशातील छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली.  यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. योजना जाहीर करतानाच त्याचे लाभार्थी कोण असतील, हेही जाहीर केले होते. तरीही अनेकांनी आयकर भरत असतानाही सुद्धा नोंदणी केली होती.

महत्वाच्या बातम्या –