राज्यातील ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

शेतकरी

जालना – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तसेच मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पाऊसांच्या हलक्या सरींनी हजेरी सुद्धा लावली. वातावरणात झालेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये धाकधुक निर्माण झाली आहे. अवेकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरवतो की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे पावसाच्या हलक्या सारी कोसळल्या त्यामुळे काढणीला आलेले पिके तसेच चारा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. त्यात काही शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी भिजली त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पाऊस आला तर फळबागांचे मोठे नुकसान होईल. हे नुकसान होऊ नये या साठी उपाययोजना करताना शेतकरी दिसून आले.

जिल्ह्यात शुक्रवारी रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. भोकरदन व जाफराबाद तालुक्यात पाऊस सुद्धा पडला. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नेहमीच नुकसान होते, अशातच गहू, ज्वारी काढणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

महत्वाच्या बातम्या –