पदवी परीक्षा १६ मार्चपासून ही परीक्षा ऑनलाइन होणार का ऑफलाइन, जाणून घ्या

परीक्षा

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व सर्व महाविद्यालयातील पदवी (अव्यावसायिक) अभ्यासक्रम परीक्षा १६ मार्चपासून घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिंस्टसिंगचे सर्व नियम पाळून या परीक्षा होणार आहेत.

प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा
पदवी परीक्षा या ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहेत. ज्यांना ऑफलाइन परीक्षा द्यायची आहे, त्यांना त्यांचे महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येणार आहे. तर विद्यापीठाने ज्या महाविद्यालयाचे केंद्र रद्द केले आहे त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इतर महाविद्यालयांत व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर परीक्षा ज्या त्या अभ्यासक्रमाच्या चालू असलेल्या पॅटर्नच्या गुणांप्रमाणे होणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा ठेवण्यात आला असल्याची माहिती परिपत्रकात दिली आहे.

दोन सत्रांत होणार परीक्षा
दरम्यान, ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या सत्रात तीन आणि दुपारच्या सत्रात तीन तास असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ असे सत्र राहणार आहे. हा कालावधी केवळ काही तांत्रिक अडचणी येतील म्हणून देण्यात आला असला तरी फक्त एक तासात पेपर सोडवायचा आहे. ऑफलाइनसाठी सकाळच्या सत्रात एक तास व दुपारच्या सत्रात एक तासाप्रमाणे सकाळी ११ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते ४ ही वेळ दिली आहे. दरम्यान परीक्षेसंदर्भातच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठाने पाच अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या –