राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्यामुळे राज्य सरकारच्या मदतीला धावले फ्लिपकार्ट

मुंबई – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यात व्हेंटिलेटर्सचा तुडवडा भासत आहे. अशात राज्य सरकारच्या अडचणी वाढत असताना फ्लिपकार्ट आणि गिव्ह इंडिया टीम सरकारच्या मदतीला धावून आली आहे.

फ्लिपकार्ट आणि गिव्ह इंडिया टीमने राज्याच्या आरोग्य विभागाला 28 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी  फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती, श्री. रजनीशकुमार यांचे आभार मानले असून  तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना याची नक्की मदत होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

यासंबंधीचे आभार पत्र  मुख्यमंत्र्यांनी डिप्पी वांकाणी, संचालक फ्लिपकार्ट यांना दिले त्यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –