लॉकडाऊन टाळण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करा – छगन भुजबळ

नाशिक – नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. तसेच शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करुन नागरिकांशी व व्यावसायिकांशी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधून लॉकडाऊन टाळण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे कडक पालन करण्याचे आवाहन केले.नाशिक शहरातील राणाप्रताप चौक, उत्तमनगर, पवननगर, त्रिमुर्ती चौक, सिडको, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, रविवार कांरजा या भागातील गर्दीच्या ठिकाणांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी. रंजन ठाकरे, नानासाहेब महाले, दिलीप खैरे उपस्थित होते.पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ठक्कर बस सॅण्ड तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी थांबून रिक्षा चालक व दुकानदार यांचेशी संवाद साधत त्यांना मास्क वापरण्याचे व कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

तसेच कोरोनासारख्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वांचे सहकार्य असणे आवश्यक आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना केले.कोरोनाचे नियम न पाळल्यास होणार कारवाईपालकमंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरुन प्रत्येक नागरिकाला, दुकानदाराला, रिक्षा चालकाला,हॉटेल व्यावसायिकाला, विक्रेत्यांना मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच यावेळी नियंमाचे पालन न करणाऱ्या दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, विक्रेते, नागरिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही पोलिसांना यावेळी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –