नियम पाळा, लॉकडाउन टाळा राज्यातील जनतेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला इशारा

राजेश टोपे

मुंबई – गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नियम पाळा, लॉकडाउन टाळा असं सांगत राज्यातील जनतेला असा इशारा दिला आहे. लॉकडाउनच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासंबंधी चर्चा नेहमी सुरु असते. निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधीचं पावलं राज्य शासन उचलणारच आहे असे त्यांनी सांगितलं आहे. त्यादृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. गर्दी टाळावी हाच दृष्टीकोन आहे. गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी कठोर निर्बंध आणण्यासाठी नियोजन करत आहोत. अंतिम झाल्यानंतर त्यानंतर कळवण्यात येईल”असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे म्हणाले,ऑक्सिजनचा वापर 80 टक्के आरोग्यासाठी व 20 टक्के उद्योगासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच लसीकरणातही राज्यात वेग आणला असून सार्वत्रिक प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे, येत्या काही दिवसांत रुग्णसंख्या नक्कीच कमी होईल, असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले,“बेड्स उपलब्ध नाही अशी परिस्थिती मुंबईत किंवा जिल्ह्यांमध्ये कुठेही नाही. काही ठराविक रुग्णालयात जिथे खूप मागणी असते तिथे अडचणी निर्माण होत आहे. सध्या मुंबईत आयसीयूचे ४०० बेड्स, ऑक्सिजनचे २१६० बेड्स आणि व्हेंटिलेटरचे २१३ बेड्स उपलब्ध आहेत. बेड्स वाढवण्याच्या सूचना सर्व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –