शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा या मागणीसाठी आ. नमिता मुंदडा यांचं विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन

मुंबई – शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा या मागणीसाठी भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा हप्ता भरून देखील या पिकांच्या नुकसानीपोटी पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना रक्कम देताना जाचक अटी लादल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अनेक अडचणी आल्या. या अनुषंगाने भाजप आमदारांनी आंदोलन केले.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. ही भरपाई देण्यास विमा कंपन्यांना भाग पाडावे अथवा राज्य सरकारने द्यावी अशी मागणी भाजपने केली आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही कंपनीने नुकसानभरपाई देताना जाचक अटी लादल्या. त्यामुळे नुकसान हाेऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.

दरम्यान, कृषी विभागाने सरकारला दिलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांना मदत मिळाली. हेच पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यात यावी याकरिता हे आंदोलन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –