‘या’ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला; गुरुवारी आढळले १५५७ कोरोनाबाधीत

कोरोना

औरंगाबाद – औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला. गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाच्या १५५७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील ११६५, तर ग्रामीण भागातील ३९२ रुग्णांचा समावेश आहे. तर गुरुवारी एकाच दिवसात पंधरा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, ५२४ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देखील देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६२ हजार ९९२ वर पोहोचली आहे. यातील ५३ हजार ०३९ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली, त्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या ८ हजार ५७० रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार ३८३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर तसेच जिल्हा प्रशासनाने शहराच्या सहा प्रवेशद्वारावर पुन्हा अँटीजन चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चाचणीत जे निगेटीव्ह असतील त्यांनाच शहरात प्रवेश दिला जाईल असे मनपा प्रशासनाने कळवले आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात १४ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान अशंत: लॉकडाउन सुरु आहे. तसेच शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी संपुर्ण लॉकडाउन करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –