राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस

पाऊस

परभणी – शहरासह जिल्ह्यामध्ये शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस झाला. या वेळी शहरातील सखल भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास सुरु झालेला पाऊस सकाळी सात वाजेपर्यंत सुरु होता. दरम्यान 9. 6 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाकडून दिली आहे. शुक्रवारी 16 अंश तापमानाची नोंद झाली.

या अवकाळी पावसामुळे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. गुरुवारपासून सलग दोन दिवस झालेल्या या अवकाळी पावसाने पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. परभणी शहरात गुरुवारी रात्री वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला. शुक्रवारी पहाटे तीनपासून तर विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली़.

गुरुवारी दिवसभर काहीसे ढगाळ वातावरण होते. गुरुवारी 1.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये गहू, कांदा, आंब्याचा मोहराला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अगोदरच शेतकरी कोरोना, लॉकडाऊन, मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने अगोदरच शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल झाला आहे. तर झालेले नुकसान भरपाई भरून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या –