‘या’ जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठी भर, सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संखेने शंभरचा आकडा केला पार

कोरोना

जालना – जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशी जालन्यात कोरोनाबाधितांच्या संखेने शंभरचा आकडा पार केला आहे. बुधवारी जिल्ह्यातील १११ जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ६६ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याता आला आहे.

बुधवारी आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जालन्यातील ५९, निमपोखरी १, पोखरी सिंदखेड १, सावरगाव १, शिरसवाडी १, हरतखेडा १, दुधना काळेगाव १, कडवंची २, पीरकल्याण १, बेथल १, मंठा १, शिरपूर १, पाटोदा १, परतूर ८, वाटूर फाटा १, घनसावंगी तालुक्यातील गाढे सावरगाव १, अंबड ८, चिंचाळा १, श्रीपाद धामणगाव १, चिंचखेड १, बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी १, पठारे देऊळगाव १, जाफराबाद १, घाणखेडा १, रूपखेडा १, भोकरदन तालुक्यातील केदारखेडा १, जयदेववाडी ४, बुलडाणा ४, परभणी ४ अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे ९५ तर अँटिजनमधून १६ असे एकूण १११ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.

जिल्ह्यात ६९३ ॲक्टिव्ह रुग्ण
जालना जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ८९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १३ हजार ८१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उपचारादरम्यान ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६९३ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियम तोडणाऱ्यांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत.

महत्वाच्या बातम्या –