गारपीटीमुळे झालेल्या शेतीतील पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्या – आ. बोर्डीकर

गारपीटी

परभणी – अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या शेतीतील पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सरकारकडे केली आहे. आमदार बोर्डीकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मेलद्वारे निवेदन पाठवले आहे.

जिंतूरसह परभणी जिल्ह्यात १८ व १९ फेब्रुवारी अवकाळी पावासाह काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेले आहे. रब्बीतील ऊस, ज्वारी, गहू, हरभरा, भुईमूग व इतर सर्वच पिकांसह फळबांगांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडल्याने हवालदील झाले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीची आर्थिक मदत ऊपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे, असे आमदार बोर्डीकर यांनी निवेदनात म्हटल आहे.

मागील अतीवृष्टीत चुकीच्या निकषांमुळे मदतीपासून वंचित राहिलेले शेतकरी, विमा तक्रारी ऑनलाईन न नोंदवू शकल्यामुळे विम्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. या सर्व बाबींमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. त्यामुळे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची विनंती आमदार बोर्डीकर यांनी निवेदनात केली आहे. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन पाठवले आहे.

महत्वाच्या बातम्या –