शेतकऱ्यांसाठी खुशखबर – शेतकऱ्यांनी जुन्या ट्रॅक्टरमध्ये बसवा CNG किट, लाखोंचा होईल फायदा

नवी दिल्ली – सीएनजीआधारित देशातील पहिले ट्रॅक्टर लाँच करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आता शेतकरी जुन्या ट्रॅक्टरमध्येही सीएनजी किट बसवू शकतील. याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल. ते म्हणाले की, शेतीत ट्रॅक्टर वापरण्यासाठी तासाला सरासरी 4 लिटर डिझेल लागते, हे प्रमाण ट्रॅक्टरच्या हॉर्स पॉवरवर अवलंबून असते. त्याचा खर्च 78 रुपये प्रति लिटर अनुसार 312 रुपये येतो. दुसरीकडे, सीएनजी आधारित ट्रॅक्टर चालविण्यासाठी 4 तासांत फक्त 180 रुपयांचा सीएनजी खर्च होण्याचा एक अंदाज आहे. याच अंदाजानुसार शेतकऱ्यांना वर्षाकाठी 1 लाख रुपयांचा फायदा होईल.

रस्ते वाहतूक मंत्रालयाने सीएनजी ट्रॅक्टरची मानके निश्चित केली आहेत. त्यानुसार बाजारपेठेत हे ट्रॅक्टर उपलब्ध असतील. ट्रॅक्टरमध्ये सीएनजी किट बसविण्यात येणार असून यामुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. ट्रॅक्टर लॉन्च करताना नितीन गडकरी म्हणाले की, सीएनजीच्या इतर वाहनांप्रमाणे सुरुवातीला ते सुरू करण्यासाठी डिझेलचीही गरज भासू शकेल. यानंतर ते सीएनजीवर चालतील.

गडकरी म्हणाले की, मेक इन इंडियाअंतर्गत सीएनजी किट तयार आहेत. शेतीमध्ये वापरली जाणारी इतर साधने बायो-सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे. देशातील जवळपास 60 टक्के कार, ट्रक, बस आणि ट्रॅक्टर डिझेलवर चालतात. वापरल्या गेलेल्या एकूण डिझेलपैकी 13 टक्के ट्रॅक्टर, शेतीसंबंधी उपकरणे आणि पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपांसाठी वापरले जाते.

महत्वाच्या बातम्या –