मुंबई – थकबाकीदारांना व्याजात सूट, पण नियमित कर्ज फेडणाऱ्यांना काहीच नाही अशी टीका भाजपने अधिवेशनात केली होती. विरोधकांच्या टीकेवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी भविष्यातील प्रोत्साहन अनुदानाचे आश्वासन दिले आहे. कोरोनानंतर बिघडलेली अर्थव्यवस्था पूर्ववत झाल्यावर वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देणार असल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्पावरील सदस्यांच्या सूचनांना उत्तर देताना परिषदेत ते बोलत होते.
३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज, कृषी पंपांच्या थकीत वीज बिलावरील व्याज आणि दंडात माफी, बाजार समित्यांचे बळकटीकरण या अर्थसंकल्पातील घोषणांची पुनरुक्ती त्यानी केली. रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागाला अधिक निधी दिल्याचे स्पष्टीकरण त्यानी दिले.
आपल्यासमोर कोरोनाचे मोठे संकट आले मात्र, सर्वांच्या सहकार्याने त्यावर मात करत आहोत. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असला तरी शेती, शेतकऱ्यांनी राज्याला सावरले असून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.
महत्वाच्या बतम्या –
- चांगली बातमी – राज्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरींचा लाभ मिळणे आता सुलभ होणार
- राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फटका बसणार
- मोठी बातमी – ‘या’ अटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार
- राज्यातील शेतकऱ्यांना व सर्वसामन्यांनाही सरकारच्या ‘या’ प्लॅनमुळे होणार मोठा फायदा
- पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय