‘या’ जिल्ह्यासाठी चांगली बातमी – रविवारी १८६ रुग्णांनी कोरोनावर मात

कोरोना

जालना – जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांची सख्या वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे रविवारी १८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालायतून सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी ७९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, तर कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८०१ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण

जालना शहर ५०, खरपुडी २,परतूर तालुक्यातील हस्तूर १,घनसावंगी तालुक्यातील आंतरवाली राठी १, मंगुजळगाव १, अंबड शहर ५, अलमगाव १, बदनापूर तालुक्यातील अकोला १, जाफराबाद शहर १, जवखेडा २, हिवराबाली १, भोकरदन शहर ४, सावरखेडा २, जोमला १, मंडपशिरसगाव १, तळणी १, कोपर्डा १ तसेच इतर जिल्ह्यांतील बुलडाणा ३ असे आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७२, तर अँटिजनद्वारे ७ असे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.

३१४ रुग्ण होम क्वारंटाईन

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ३१४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर २४ जणांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांची दैनंदिन तापसून करण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग, मास्क लावले आणि सॅनिटायझर वापरणे या नियमांचे पालण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –