मुंबई – सरकारी नोकरी मिळवण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र अनेक कारणांमुळे ही संधी तरुणांच्या हातून निघून जाते मात्र आता भारतीय रिझर्व बँकेत नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये एकूण 322 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी असणार आहे. यासाठी खुला प्रवर्ग, ओबीसी, आणि ई डब्लू एस या उमेदवारांना 850 शुल्क लागणार असून इतरांना 100 शुल्क असणार आहे. तर सध्या कार्यरत असलेल्या उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/ADVTGBDRB या संकेत स्थळावर जाऊन अकाउंट रजिस्टर करून अर्ज सादर करावा. या प्रक्रियेमध्ये उमेदवारांची परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या धर्तीवर निवड करण्यात येणार आहे. यामध्ये खालील पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
ऑफिसर ग्रेड बी (डी आर) जनरल- २७०
ऑफिसर इन ग्रेड बी (डी आर) डीपीआर- २९
ऑफिसर इन ग्रेड बी (डी आर) डीएसआयएम- २३
महत्वाच्या बातम्या –
- लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
- साखर कारखान्यांनी आता बायप्रॉडक्ट्सवर भर द्यावा – शरद पवार
- सुके खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या
- राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकटाची चाहूल; राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा अंदाज