71 व्या प्रजासत्ताक दिना निमत्त गुगलचे खास डुडल

गुगलकडून कायमच काही महत्त्वाच्या प्रसंग आणि दिवसांचं औचित्य साधत त्या निमित्ताने अनुक एका दिवसाचं महत्त्वं सांगणारे डुडल साकारण्यात येतात. सध्या गुगलकडून असंच एक अतिशय खास स्वरुपाचं डूडल साकारण्यात आलं आहे.

मोबाईलमध्ये ‘हे’ अ‍ॅप डाऊनलोड करताना सावधान

निमित्त आहे ते म्हणजे भारताच्या ७१व्या प्रजासत्ताक दिनाचं 71st Republic Day. विविधतेत एकता असणाऱ्या या भारत देशाचे कैक गुणविशेष आणि सांस्कृतिक वारसा या कलात्मक डुडलमधून साकारण्यात आला आहे. ताजमहाल, इंडिया गेट, राष्ट्रीय पक्षी मोर, भारतीय कला, भारतीय वस्त्रोद्योग असे अनेक बारकावे डुडलमधून साकारण्यात आले आहेत. सिंगापूरस्थित मेरु सेठ यांनी हे डुडल साकारत सारा देशच जणून एकवटण्याची कलात्मक किमया केली आहे.

जाणून घ्या टुथब्रशचे असेही फायदे

भारतीय संविधाच्या आखणी आणि अस्तित्वात येण्यानंतर प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताची नवी ओळख समोर आली. अशा या दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहसुद्धा पाहायला मिळत आहे.