पॉझिटीव्हीटी रेट कमी असल्यामुळे उद्यापासून ‘हा’ जिल्हा पूर्णपणे अनलॉक

लातूर – ज्या जिल्ह्यातील पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे, अशा जिल्ह्यात अनलॉक करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. त्यानुसार लातूर जिल्हा आता पूर्णपणे अनलॉक करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेबरोबरच या गटात नसलेले ईतर सर्व दुकाने आणि अस्थापना नियमित सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बाजारपेठांबरोबरच मॉल्स, सुपर शॉप्स, चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहे, तसेच रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स नियमित सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्याच बरोबर सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, मॉर्नीग वॉक आणि सायकलिंगलाही परवानगी देण्यात आली आहे. लग्न समारंभांना १०० तर अंत्यविधीसाठी ५० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.

त्याच बरोबर व्यायामशाळा, जिम, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटरला देखील जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित सुरू करण्यास परवानगी दिली आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या अत्यंत कमी झाली असून अनेक हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड्स रिकामे आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –