मुंबई – २०२१ मध्ये दहावीच्या परीक्षा (SSC) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे वृत्त हाती येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षा अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. कोरोनाच्या धोक्यामुळे हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना भरण्याची सोय करण्यात आली होती.
नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं 23 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान अर्ज भरण्याची मुदत दिली होती. ही मुदत आज समाप्त होणार होती. हे अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. तर, आज शेवटचा दिवस असल्याने एकाचवेळी अनेक विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी प्रयत्न करत होते.
अशातच वेबसाईट हँग झाल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त झाले होते. मात्र, आता बोर्डाने विद्यार्थ्यांना मुदतवाढ करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता २५ जानेवारीपर्यंत नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. यासाठी अधिकचे शुल्क देखील आकारण्यात येणार नाही.
अर्ज www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून भरता येईल. तर, पुनर्परीक्षार्थी वा खासगी विद्यार्थी 12 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 दरम्यान प्रचलित पद्धतीनं ऑनलाइन अर्ज भरू शकतील.
महत्वाच्या बातम्या –
- मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र
- राज्यातील 6 जिल्ह्यांना बर्ड फ्ल्यूचा धोका, ‘या’ जिल्ह्यातील 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार
- ‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या
- केंद्राने शेतकऱ्यांचे हे आंदोलन योग्यप्रकारे हाताळले नाही – जयंत पाटील