राज्यातील ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

पाऊस

जालना – जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या दरम्यान आज शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता भोकरदन तालुक्यातील काही भागात अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. पंधरा दिवसांपूर्वीच तालुक्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी पुन्हा गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

भोकरदन तालुक्यातील निमगाव कुंभारी, हसनाबाद, तळेगाव, बोरगाव, खडकी, लतीफपूर, विटा, सावखेडा, कोपर्डा, बेलोरा, रजाळा, टाकळी, सोयगाव आदी ठिकाणी जोरदार गारांचा पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपातील काढणीस आलेल्या पिकांचे गहू, हरभरा, मका, करडई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हवामानात सातत्याने बदल होत असून मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, गारपीट तसेच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्यातर्फे देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने बीड, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय उद्या शुक्रवारी उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांत वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –