कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

अहमदनगर – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला असून राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाली आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

ग्रामविकास मंत्री तथा अहमनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यासोबतच कोव्हीड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. लसीकरणावरील बंधने केंद्र सरकारने उठविली पाहिजेत. अन्य देशांना लसी पुरवण्याआधी आपल्या देशातील नागरिकांसाठी मुबलक लस पुरवल्या पाहिजेत. अमेरिकेत असेच मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. आता तिथे नागरिक विनामास्क फिरत आहेत, असं उदाहरण देखील त्यांनी दिलं आहे.

यासोबतच, ‘आपल्याकडेही वयाचे बंधन काढून टाकले पाहिजे. लस सरकारी दवाखान्यांसोबतच बाजारातही उपलब्ध करून दिली पाहिजे. ज्यांना शक्य आहे, ते लस विकत घेतील. ज्यांना शक्य नाही, ते सरकारी दवाखान्यातून घेतील. मात्र, आता हयगय टाळली पाहिजे. येतील त्यांना टचाटच लस टोचली पाहिजे. एवढंच नाही तर नंतर राहिलेल्यांचा शोध धेऊन त्यांनाही लस दिली गेली पाहिजे,’ असं भाष्य हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –