परभणीत कोरोनाचा कहर; मंगळवारी आढळले तब्बल 379 कोरोनाबाधीत रुग्ण

परभणी – जिल्ह्यात कोरोनाचा कोरोनाचा कहर खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. तर मंगळवारी तब्बल 379 कोरोनाबाधीत आढळले आहेत. तर नऊ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये कळवले आहे.

दरम्यान 215 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. रुग्णालयातील कक्षात २ हजार 196 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 408 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 13 हजार 959 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 11 हजार 355 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 68 हजार 184 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात 1 लाख 53 हजार 644 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 13 हजार 806 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 594 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकाव्दारे कळवले आहे.

महत्वाच्या बातम्या –