राज्यातील ‘या’ जिल्ह्यामध्ये जोरदार पावसासह गारपीट, शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका

गारपीट

औरंगाबाद – खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी परिसरातील धामणगाव( गोमुखी) येथे १७ फेब्रुवारी बुधवारी रोजी सायंकाळी साडेपाच सहाच्या सुमारास जोरदार गारपीट तथा पावसाने उभ्या पिकांना फटका दिला तर गुरेढोरे, जंगलातून घरी येत असलेले नागरिकांनाहि या गारपिटीचा फटका बसला. अचानक आलेल्या गारपीटने नागरिकांची एकच खळबळ उडाली.

मागील तीनचार दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण असुण पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. १७ फेब्रुवारी बुधवारी रोजी सायंकाळी अचानक धामणगाव गोमुखी येथे व परिसरात सर्कल मधे जोरदार गारपीटला सुरवात झाली. गारही गोट्या प्रमाणे होत्या. गारपिटीने शेतात उभे ज्वारी गहु मका करडी पिकांना चांगलाच फटका दिला. पावसाच्या भीतीने शेतकरी गहु मका करडी ज्वारी ज्वस काढणीला लागलेला होता.

परंतु आखेर निसर्ग तथा आवकाळी पाऊस तथा गारपिटने फटका दिलाच. त्यात गारपीट मुळे संध्याकाळी घरी येत असलेले नागरिक गोरेढोरे यांना चांगला मार सहन करावा लागला गर्जना सह पाऊस गारपीट झाली. धामणगाव वगळता बाजार सावंगीसह परिसरात सर्वत्र तुरळक पाऊस पडला. यामुळे शेतक?्यांत एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या –