कवठ खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

कवठ हे फळ ग्रामीण भागातील लोकांनी जास्त करून खाल्ल असावं. कारण शेतकऱ्यांच्या बांधावर ही झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. कवठाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी फायद्याचे आहेत. कवठाला संस्कृतमध्ये ‘दधिफल’ किंवा ‘कपित्थ’ असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये ‘वुड अ‍ॅपल’ असं म्हणतात. कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

  • कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकारांवर उपयुक्त आहे.
  • कवठ हे मधुर आम्लरसाचे असल्यामुळे भूक कमी लागत असेल तर याच्या सेवनाने भूक वाढीस मदत होते.
  • कवठ हे स्तंभनकार्य करीत असल्यामुळे जुलाब होत असतील तर कवठ सेवनाने जुलाब कमी होतात.
  • कवठामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ‘क’ जीवनसत्त्वासह लोह, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, फायबर असे सर्व पौष्टिक मूलद्रव्य कवठामध्ये असतात.
  • कवठाची पाने स्वच्छ धुऊन त्याची मेथीच्या भाजीसारखी भाजी बनवावी किंवा ही पाने पिठामध्ये मळून थालिपीठे बनवावी.  कवठाच्या पानांमध्ये भरपूर पोषक घटक, फायबर  व ‘ब’ जीवनसत्त्व असल्याने ती आरोग्यसाठी लाभदायक असतात.

महत्वाच्या बातम्या –