पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; देशात आणखी कडक निर्बंध लागण्याची शक्यता

नवी दिल्ली: राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली असून यामध्ये देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरणाबाबत चर्चा होत आहे. आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा दृष्टीनं या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे आता आता केंद्राकडून काय निर्णय घेण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबैठकीला केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि डॉक्टर विनोद पॉल या बैठकीला उपस्थित आहेत. भारतात रविवारी कोरोनाच्या 93,249 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या एका वर्षात एका दिवसात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यानंतर आता देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,24,85,509 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जारी करत माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –