शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी या मागणीसाठी विम्याच्या प्रतिकात्मक अध्यादेशाची शेतकऱ्यांकडून होळी

शेतकरी

बीड – बीड जिल्ह्यातील गेवराईच्या खळेगाव येथे पिक विमा संदर्भातील जाचक अटी रद्द करून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी या मागणीसाठी विम्याच्या प्रतिकात्मक अध्यादेशाची होळी करून जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सरकार आणि विमा कंपनीने ७२तासाच्या आत पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी खळेगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी केली.

खळेगावमध्ये वादळी वाऱ्याने गावातील वीज खांब पडले असून शेतातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका, बाजरी, कांदा, टरबूज, खरबूज, फळभाज्या, पालेभाज्या पुर्णत: वाया गेले आहे.

महसूल कृषी तसेच विमा कंपनीने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टर पन्नास हजार अनुदान देण्यात यावे. तसेच पिक विमा कंपनीने ७२ तासांच्या आत स्थळ पंचनामे करून शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा. तसेच शासनाकडून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे नसता आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या –