मला तर प्रिय बळीराजाचं शिवार ,पक्वान्नाहूनही गोड लागे बळीराजाच्या घरातला आहार – दादा भुसे

दादा भुसे

मुंबई – राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांचा वाढदिवस झाला. राज्याचे कृषिमंत्री आणि मालेगाव बाह्य मतदार संघातील शिवसेनेचे आमदार दादा भुसे सिविल इंजिनियर आहेत प्रारंभी दोन वर्षे ते सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते मात्र ते नोकरीत रमले नाही त्यांनी मूळ गावी मालेगाव व्यवसाय सुरू केला. त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला राजकारणातील प्रस्थापितांशी संघर्ष करून ते आमदार झाले.

मालेगाव बाह्य मतदार संघात सलग चौथ्यांदा विजय झालेले राज्याचे कृषिमंत्री पदी संधी मिळालेल्या दादा भुसे यांची कार्यकर्ता ते कॅबिनेट कृषिमंत्री ही वाटचाल मार्गदर्शक आहे. शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांमध्ये भुसे यांची समावेश होतो. यावेळी शनिवारी वाढदिवशी भुसे यांनी एका शेतकरी कुटुंबात जेवण करत आपला वाढदिवस साजरा केल्याचं सांगितलं. याबद्दल ट्वीट करत त्यांनी म्हटले की, ‘वाढदिवसाच्या दिवशी नको फुलं आणि हार ,मला तर प्रिय बळीराजाचं शिवार ,पक्वान्नाहूनही गोड लागे बळीराजाच्या घरातला आहार’ असे त्यांनी यावेळी म्हटले.

नुकताच विधानसभेत भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असून त्यातील निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. या योजनेसंदर्भात राज्यशासन नवीन धोरण आणणार असल्याचे सांगितले. सदस्य कैलास घाडगे-पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याची नुकसान भरपाई मिळण्याबातचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना भुसे म्हणाले की, या जिल्ह्यातील 9.51 लाख शेतकऱ्यांनी 5.19 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. जिल्ह्यातील सुमारे 71 हजार 826 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –