मी केंद्र सरकारला विनंती करते की कृषी कायदे रद्द करावेत – ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी व आमदरांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. तर, डाव्या पक्षांनी काँग्रेसला सोबत घेत ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटले आहे. अशावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं समोर राज्यातील आपले वर्चस्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात गोंधळ उडाला होता. त्यांनतर आता पुन्हा तृणमूलच्या पाच नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ममता यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते मदन मित्रा यांनी भाजपवर जोरदार टीका केली एका प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. मित्रा म्हणाले ‘ मोदी या शब्दाचा अर्थ ‘लोकशाहीची हत्या’ असा होतो. तुम्ही जर आम्हाला दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितलं तर तुम्हाला चिरुन टाकू,’ असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणूक नंदीग्राममधून लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. नंदीग्राम हा शुभेंद्रू अधिकारी यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे यंदा नंदीग्रामची निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

या आधी २६ जानेवारीला चिघळलेल्या शेतकरी आंदोलनावर  ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देतं नाही. कृषी कायदे घाईत गडबडीत आणले गेले आहेत. कोरोना काळात अवाजवी मतदानानं हे कायदे मंजूर करण्यात आले आहेत. मी केंद्र सरकारला विनंती करते की कृषी कायदे रद्द करावेत असं त्यांनी म्हटलं होत.

महत्वाच्या बातम्या –