मला माझ्याच शेतात जाण्यासाठी एक हेलिकॉप्टर खरेदी करायचंय, हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कर्ज द्या; महिला शेतकऱ्याचे राष्ट्रपतींना पत्र

हेलिकॉप्टर

भोपाळ- मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील महिला शेतकरी बसंतीबाई लोहार या गेल्या काही दिवस झाले सोशल मीडियात चर्चेत आहेत.या महिला  शेतकऱ्याने सरकारी यंत्रणेच्या शेजाऱ्यांच्या आणि सरकारी यंत्रणांच्या कारभाराला कंटाळून थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे.

बसंतीबाई लोहार यांच्या शेताकडे जाण्याचा मार्ग शेजाऱ्यांनी बंद बंद केला आहे . त्यांना या संकट काळात कोठूनही मदत मिळत नाही म्हणून तिने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक विनंती केली आहे.मला माझ्याच शेतात जाण्यासाठी एक हेलिकॉप्टर खरेदी करायचंय. हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कर्ज द्या अशी मागणी केली आहे.

याबाबत त्या म्हणाल्या, ‘माझी 0.41 हेक्टर जमीन आहे. शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालतो. मात्र आमच्या शेतात जाणारा रस्ता गावातील काही गुंडांनी बंद केलाय. शेतात जाण्याच्या मार्गावर मोठा खड्डा खोदलाय.

हा रस्ता पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी आजवर सरकारी दरबारात अनेकदा पायऱया झिजवल्या. तिथं कुणी माझी तक्रार ऐकून घ्यायलाही तयार नाही. त्यामुळे मला माझ्याच शेतात जाण्यासाठी एक हेलिकॉप्टर खरेदी करायचंय. त्यासाठी मला कर्ज आणि हेलिकॉप्टर चालवण्यासाठी परवाना हवाय.’

महत्वाच्या बातम्या –