मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आज चर्चा करून लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार – राजेश टोपे

पुणे – कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

राज्यात काल तब्बल ३० हजार ५३५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने राज्याची वाटचाल ही बिकट परिस्थितीकडे होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला असला तरी मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्वाचं भाष्य केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत आहे. आज याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. काही दिवस दिले जातील. लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचं असेल तर जनतेनं नियम पाळायला हवे, असं आवाहनही टोपे यांनी नागरिकांना केलंय. अजून 2-4 दिवस कोरोना रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे प्रमाण कमी होईल, असा अंदाज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –