आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश नसेल तर, होऊ शकतात ‘हे’ आजार

जीवसत्व आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक असतात. शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता आढळल्यास विविध आजार होण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या आहारात अ जीवनसत्त्वाची कमतरता आहे का ? तुम्ही गाजर टोमॅटो, पालेभाज्या कमी खाता का? असं असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं.नुकत्याच हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार अ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता दहापट वाढते.

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता का जाणवते ?

यासोबत डोळ्याचा समस्या आणि इतर आजारही तुम्हाला होण्याचा धोका अधिक असतो. अ जीवनसत्त्व तुमची प्रतिकारक शक्ती वाढवतं. एका अहवालाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा आणि क्षयरोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात.

हिवाळ्यात सीताफळ खाणे फायदेशीर !

साधारणपणे पिवळ्या, नारिंगी रंगाच्या सर्व पदार्थातून अ जीवनसत्त्व मिळते. कॉड माशाचे तेल, लिवर, अंडी या प्राणिज स्रोतांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’चे प्रमाण सर्वात जास्त असते. शिवाय दूध, दुधाचे पदार्थ, सर्व नारिंगी-पिवळ्या भाज्या जसे आंबा, गाजर, टोमॅटो, लाल भोपळा, आंबा, पपई, सर्व हिरव्या पालेभाज्या यातूनही अ जीवनसत्त्व मिळतं. त्यामुळे रोजच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.