महिनाभर कडक लॉकडाऊन नको असेल, तर सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे

संचारबंदी

औरंगाबाद – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान, दर शनिवार आणि रविवारी १०० टक्के लॉकडाऊन असणार आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. या काळात नियमांते उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी कडक लॉकडाऊन नको असेल, तर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. महिनाभर पूर्ण व्यवहार ठप्प नको, असे वाटत असल्यास सर्वांनी मास्क, सॅनिटायझेशन, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लॉकडाऊनदरम्यान काय सुरू?
वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा, दूध व भाजीपाला विक्री, हॉटेल, रेस्टॉरंटमधील होम डिलिव्हरी रात्री ११ वाजेपर्यंत, फळे विक्री व पुरवठा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, एसटी बस, रिक्षा, बांधकामे, उद्योग व कारखाने, फक्त दुकानमालक असलेली किराणा दुकाने, मांस विक्री दुकाने, गॅरेज, पशुखाद्य दुकाने, बँक व पोस्ट सेवा.

लॉकडाऊनदरम्यान काय बंद?
जीवनावश्यक वगळता अन्य दुकाने, डी मार्ट, रिलायन्स, बिग बाजार, मोर आदी मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे, सर्व खासगी कार्यालये, आस्थापना, मनपाची शहर बससेवा बंद राहील.

आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक?
लॉकडाऊनच्या ११ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत ज्या आस्थापनांना व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, त्या आस्थापनांचे मालक, चालक, कर्मचारी, मजुरांची दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून त्याचा अहवाल सोबत बाळगणेही अत्यावश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंड तसेच साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भादंवि. १८६० मधील तरतुदींअन्वये गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –