महत्वाची बातमी – शेतकऱ्यांसाठी शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी ‘विशेष योजना’, असा करा प्रस्ताव सादर

शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते. शेततळयामुळे पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते. शेततळयामुळे पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. असे अनेक शेततळयाचे फायदे आहे.

विशेष केंद्रिय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतात शेततळयाचे खोदकाम प्लास्टिक अस्तरीकरणासह करणे ही योजना मंजुर असून अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांकडून या कार्यालयाचे कार्यक्षेत्र असलेल्या औरंगाबाद, जालना,बीड व लातूर या जिल्हयातील रहिवासी असलेल्या व पुढील अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छूक लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याबाबत प्रकल्प जाहिर आवाहन करण्यात येत आहे.

  • लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा दारिद्ररेषेखालील असावा
  • लाभार्थी आदिम जमाती,विधवा महिला,परितक्त्या स्त्री असल्यास प्राधान्य देण्यात येईल
  • लाभार्थ्यांकडे किमान १.०० हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक
  • गटातील सदस्यांनी अथवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी या पुर्वी सदर योजनेचा घेतला नसल्याचे प्रमाणपत्र देण आवश्यक
  • लाभार्थ्यांचे नावे राष्ट्रीयकृत बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे.
  • वरील प्रमाणे लाभार्थ्यांचे नाव असलेला ७/१२ नमुना ८ अ, जातीचा दाखला,दारिद्रयरेषेखालील दाखला,लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, विधवा अथवा परितक्त्या असल्यास तसे प्रमाणपत्र,बँक पासबुक व दोन पासपोर्ट साईज फोटोसह आपला प्रस्ताव सादर करावा.

परिपूर्ण आपला प्रस्ताव सादर करण्यासाठी आपण या ठिकाणी कार्यालयात करावा – शासकीय सुटी सोडून दि. २० जून २०२१ पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद, रिलायंस मॉल बिल्डिंग, तिसरा मजला व्यापारी गाळे, गजानन महाराज मंदिराजवळ औरंगाबाद या पत्त्यावरील कार्यालयात दाखल करुन योजनेचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –