महत्त्वाची बातमी – राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी ‘ही’ आहे अट

शेतकरी

नांदेड – महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र ११ हजार ५०० शेतकऱ्यांची सातवी यादी १ जानेवारी २०२१ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी ७ हजार ६८१ शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत आधार प्रमाणिकरण केले नाही. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार नाही. आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण यांनी केले आहे.

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९’ ही २७ डिसेंबर २०१९ च्या शासननिर्णयाद्वारे कार्यन्वित केली आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील ३० सप्टेंबर २़०१९ रोजी रुपये २ लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्यावी.

आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हा व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्याव्यात असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –