राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अवघ्या अकरा दिवसांत तब्बल १७०० नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले

कोरोना

औरंगाबाद – कोरोना संसर्ग पुन्हा एकदा शहरात जोमाने पसरू लागला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावेळी घराघरात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरालाच कोरोनाने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील अवघ्या अकरा दिवसांत तब्बल १७०० नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यात शंभरपेक्षा अधिक कुटुंबे बाधित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मागील अकरा दिवसांपासून औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. बाधित रुग्णांची संख्या अधिक गतीने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी कोणतीही लक्षणे नसलेले कोरोनाचे रुग्ण आढळत होते. मात्र आता लक्षणे असलेले रूग्णच अधिक निघत आहेत. यात सर्दी, खोकला, ताप यासह निमोनिया आजाराची लक्षणे असलेले रूग्ण आढळून येत असल्याने या रूग्णांना तातडीने उपचाराची आवश्यकता आहे.

शहरात १५ फेब्रुवारीपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापूर्वी रुग्ण संख्या ही ५० च्या आत होती. मात्र दहा दिवसातच ही संख्या १७०० वर पोहचली आहे. तर मागील तीन दिवसांतच हा आकडा ७२७ वर गेला आहे. यावरूनच कोरोनाचा संसर्ग झपाटयाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने कठोर निर्बंध लागू करीत तातडीने उपाययोजना राबविण्यास सूरूवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या –