औरंगाबाद – मराठवाड्यात गुरुवारी दिवसभरात ६५४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबादेतील सर्वाधिक २७५ रुग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ जालना ८५, लातूर ८०, नांदेड ७०, बीड ५३, परभणी ४१, हिंगोली २४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबादमध्ये गुरुवारी एकाच दिवसात २७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ७२ जणांना यशस्वी उपचारानंतर सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९ हजार ५६६ वर पोचली असून यातील ४६ हजार ७९३ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे, तर १ हजार २६२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ५११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
उपचारादरम्यान १० जणांचा मृत्यू
मराठवाड्यात गुरुवारी उपचारादरम्यान 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबादमधील चार, जालन्यात दोन, लातूर, हिंगोली, परभणी, बीडमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २७ आणि २८ फेब्रुवारीला जनता कर्फ्यू
- मोठी बातमी – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे मोठे संकट; राज्यात आज सापडले ‘इतके’ रुग्ण
- मोठी बातमी – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यातील शाळा ७ मार्चपर्यंत राहणार बंद
- शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे ‘हा’ नेता आक्रमक
- मंत्रालय परिसरात महानंद, आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचे उद्घाटन