मराठवाड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ असून रविवारी ५१५ नव्या रुग्णांची भर

कोरोना

औरंगाबाद – मराठवाड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. रविवारी ५१५ रुग्णांची भर पडली, तर आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात एकूण २०८ जण कोराेनामुक्त झाले. सध्या आठही जिल्ह्यांत मिळून २ हजार ७९० रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रविवारी औरंगाबादमध्ये २०१, जालना ९६, परभणी २१, हिंगोली १६, नांदेड ६०, लातूर ४४, उस्मानाबाद २४ व बीडमध्ये ५३ नवे रुग्ण आढळले. जालन्यात सर्वाधिक चार मृत्यू झाले. औरंगाबाद जिल्ह्यात ३, तर परभणीत एक जण मृत्युमुखी पडला.

औरंगाबादेत रुग्णसंख्या दोनशेपार; तिघांचा मृत्यू
औरंगाबाद : रविवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने २०१ रुग्णांचा आकडा गाठला, तर तिघांचा मृत्यू झाला. यापैकी १८४ जण शहरातील, तर १७ जण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४८ हजार ६३८ वर पोहोचली आहे. यापैकी ४६,४६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर औरंगाबादेत आतापर्यंत १ हजार २५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जालन्यात उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू, ९६ नवे बाधित रुग्ण
जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून रविवारी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला, तर ९६ नव्या बाधितांची भर पडली. तसेच यशस्वी औषधोपचारानंतर चौघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ५२८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १३ हजार ६६९ जणांनी कोरोनावर मात केली असून उपचारादरम्यान ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात सध्या ४७५ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर प्रयोगशाळेत ५७९ नमुने प्रलंबित आहेत.

बीड जिल्ह्यात ५३ नवे रुग्ण, तर २७ कोरोनामुक्त
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ४१९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ३६६ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ५३ पॉझिटिव्ह आले. यात अंबाजोगाई १९, बीड १६, शिरूर कासार ६, परळी ५, केज ३ तसेच आष्टी, धारूर, गेवराई, पाटोदा तालुक्यातील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. तसेच रविवारी २७ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १८ हजार ४१६ एवढी झाली आहे. पैकी १७ हजार ५४५ जण कोरोनामुक्त झाले तर ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे.

परभणीत २१ नवे रुग्ण; एकाचा मृत्यू
परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णात वाढ होत चालली आहे. रविवारी २१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर २० जणांना उपचारानंत डिस्चार्ज देण्यात आला. सध्या परभणी जिल्ह्यात १७८ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची आतापर्यंत ८ हजार २६८ एवढी झाली आहे. यातील ७ हजार ७६९ रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळं ३२१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे १६ नवे रुग्ण
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे १६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४ जणांना उचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रॅपिड अँटीजन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आल्या. नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये हिंगोली परिसरातील १५ तर औंढा परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –