राज्यातील ‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात 1128 कोरोनाबाधित रुग्णांची भर

कोरोना

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात आज 308 जणांना (मनपा 277 तर  ग्रामीण 31) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 51689 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1128 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 58829 झाली आहे.

आजपर्यंत एकूण 1344 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5796 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्हामध्ये अंशत: लॉक डाऊन लावले आहे. तर शनिवार ते रविवारी पुर्णत: लॉकडाऊन जाहीर केले होते. याला पहिल्या दिवशी शनिवारी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तर रविवारी मात्र नागरिक नेहमीप्रमाणे घराच्या बाहेर तर पडतच होते. तर काही तर विमा मास्क देखील घराच्या बाहेर पडताना दिसत होते. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन सर्व लोकप्रतिनिधी तसेच मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त तसेच विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांनी देखील केले होते.

परंतू कोराेनाचा कहर तर अंशत: लॉकडाऊन तसेच पुर्ण लॉकडाऊन केले तरी थांबताना दिसत नाही. परंतू सोमवारी जिल्हा प्रशासनाने हॉटेल तसेच छोटे – मोठे पान, चहा टपऱ्या, रेस्टॉरंट, हॉटेल तसेच परमीट रुम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर १७ मार्च ते ४ एप्रिल हॉटेलच्या जेवनाचे पार्सल सुविधा सुरु ठेवण्याचे आदेश देखील दिले आहेत. नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन पोलिस, जिल्हा प्रशासन तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तर नियमीतपणे मास्क वापरणे, सॅनेटायझरचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे, विनाकारण जमाव न जमवणे, तसेच जमावात न जाण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तर काही त्रास जाणवल्यास त्वरीत आपल्या जवळच्या दवाखान्यात डॉक्टरांकडून तपासणी करुन घेण्याचे देखील आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –