‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात आढळले ३ हजार ०९८ कोरोनाबाधित रुग्ण

कोरोना

पुणे – पुणे शहरात आज नव्याने ३ हजार ०९८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ४० हजार ८३४ इतकी झाली आहे. कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे.

सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात ११ हजार ३१० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १३ लाख ४९ हजार ९९९ इतकी झाली आहे. शहरातील १ हजार ६९८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ११ हजार ३०४ झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २४ हजार ४४० रुग्णांपैकी ५५५ रुग्ण गंभीर तर १०२० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने २२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ९० इतकी झाली आहे.

‘पुण्यातील परिस्थिती सुधारली नाही तर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो,’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. याबाबत प्रतिक्रिया देताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे की, ‘सद्यस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येऊ नये. हवं तर निर्बंध आणखी कडक करा, पण लॉकडाऊनचा निर्णय घेऊ नका,’ अशी विनंती महापौरांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –