राज्यातील ‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५५० नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद

कोरोना

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ५५० नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच जिल्ह्यात एकाच दिवसात ५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक होता, तेव्हा ८ सप्टेंबर २०२० रोजी एकाच दिवसात सर्वाधिक ४८६ रुग्ण सापडले होते.

दरम्यान, गेल्या २४ तासात मनपा हद्दीत ३३७ आणि ग्रामीण भागात ३६ अशा ३७३ जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. सध्या जिल्ह्यात ३ हजार २२१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ९०७ वर पोहोचली आहे, तर १ हजार ३०४ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ३८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मृतांमध्ये ३२ वर्षीय पुरुष
मोरहिरा औरंगाबाद येथील ३२ वर्षीय पुरुष, वैजापुरातील ७५ वर्षीय पुरुष, चैतन्यनगरातील ४९ वर्षीय स्त्री, रेल्वेस्टेशन भागातील ५१ वर्षीय स्त्री, उस्मानपुरा येथील ८४ वर्षीय पुरुष यांचा घाटीत मृत्यू झाला. माळीवाडा (ता. कन्नड) येथील ६५ वर्षीय पुरुष, शहरातील नॅशनल कॉलनीतील ७० वर्षीय पुरुष आणि ६९ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

मनपा हद्दीत 462 रुग्णांची नोद
एन दोन सिडको (4), शासकीय कर्करोग रूग्णालय परिसर (1), सिडको (2), गारखेडा (7), ब्रिजवाडी (1), सातारा परिसर (11), एसआरपीएफ कॅम्प (1), शंकुतला नगर (1), अविष्कार कॉलनी (1), जाधववाडी (3), पडेगाव (3), हिमायत बाग (5), एन सात (2), एन सहा (8), खडकेश्वर (1), नागेश्वरवाडी (2), कॅनॉट प्लेस (1), काल्डा कॉर्नर (2), राणा नगर (1), संजय नगर (2), मिलिट्री हॉस्पीटल (1), भारतमाता नगर (1), बालाजी नगर (5), अमृतसाई प्लाजाच्या मागे, रेल्वे स्टेशन परिसर (1), उस्मानपुरा (2), रेल्वे स्टेशन परिसर (1), आकाशवाणी कॉलनी (2), जय भवानी नगर (4), एमजीएम हॉस्पीटल परिसर (2), तापडिया नगर (2), एन दोन ठाकरे नगर (2), पारिजात नगर (1), गारखेडा, शिवनेरी कॉलनी (2), मयूर पार्क (5), शहानूरवाडी (4), नक्षत्रवाडी (3), गुलमोहर कॉलनी (1), एसबी कॉलनी वेस्ट (2), टिळक नगर (3), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ, म्हाडा कॉलनी (2), एन चार (5), एन तीन (3), अरूणोदय कॉलनी (1), तोरणागड नगर (1), एन वन (5), एन पाच सिडको (2), हनुमान नगर (1), उत्तरानगरी, चिकलठाणा (2), खडकेश्वर (1), एन तीन, कामगार चौक, सिडको (2), प्रकाश नगर (1), एमआयडीसी चिकलठाणा (1), इटखेडा (2), शेंद्रा (2), बीड बायपास (5), शंकुतल नगर (1), समर्थ नगर (3), वेदांत नगर (3), विराज नगर (1), गुलमंडी (1), श्रीकृष्ण नगर, हडको (1), शहागंज (1), कासलीवाल मार्बल (3), शिवाजी नगर (4), उल्कानगरी (7), रेणुका नगर (1), छत्रपती नगर (3), सवेरा कंपनी परिसर (2), विद्या नगर (1), अलंकार हा.सो (1), पुंडलिक नगर (1), जाधवमंडी (1), जय भवानी विद्या मंदिर परिसर (1), ज्ञानेश्वर नगर (1), इंदिरा नगर (1), विजय नगर (1), खिवंसरा पार्क (1), मिटमिटा (2), दशमेश नगर (2), व्यंकटेश कॉलनी (1), केंब्रिज स्कूल परिसर (2), अशोक नगर (2), बालकृष्ण नगर (2), मयूर नगर (1), एन बारा सिडको (1), हर्सुल (5), तुळजाभवानी चौक (1), सौभाग्य चौक (1), एन तेरा (1), एन अकरा (2), भगतसिंग नगर (1), भावसिंगपुरा (1), संभाजी कॉलनी एन सहा (1), हडको (3), एन आठ, जिव्हेश्वर कॉलनी (1), पिसादेवी (1), हरसिद्धी माता नगर (1), फाजिलपुरा (2), एन नऊ (2), दर्गा रोड (1),एम दोन, टीव्ही सेंटर (1), कांचनवाडी (7),पंचशील नगर (1), न्यू भीमाशंकर कॉलनी (1), जटवाडा रोड (1), अष्टविनायक नगर (1), संषर्ष नगर (2), बंजारा कॉलनी (2), ओमश्री गणेश नगर (1), विष्णू नगर (2), एन आठ (1), एमआयटी कॉलेज (1), स्वराज नगर, मकुंदवाडी (1), गादिया विहार (1), पंचवटी हॉटेल परिसर (1), कोकणवाडी (1), धावणी मोहल्ला (1), विश्वभारती कॉलनी (1), बन्सीलाल नगर (3), दिशा सिल्क सिटी, पैठण रोड (1), घाटी परिसर (1), प्रताप नगर (1), संदेश नगर (1), देवळाई (2), स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी (2), न बारा हडको (1), एमआयटी कोविड केअर सेंटर (1), पेशवे नगर (3), औरा व्हिलेज (1), सूतगिरणी चौक परिसर (2), पद्मपुरा (1), स्नेह नगर (1), देवानगरी (1), अन्य (197)

ग्रामीण भागात आढळले 88 नवे रुग्ण
वैजापूर (1), बिडकीन (1), कन्नड (2), नाथ विहार पैठण (1), गंगापूर (2), रांजणगाव (2), खुलताबाद (2), फुलंब्री (1), वाळूज (2), शेणपूजी, गंगापूर (1), तालवाडी, वेरूळ (1), सिडको महानगर एक (4), बजाज नगर (9), म्हाडा कॉलनी, तिसगाव (1), साऊथ सिटी (2), लासूर स्टेशन (1), सावंगी (1), देवगाव रं (1), अन्य (53)

महत्वाच्या बतम्या –