देशभरात गेल्या २४ तासात कोरोनामुळे तब्बल ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

कोरोना

मुंबई – देशभरात गेल्या २४ तासात ४९१ मृत्यू झाले आहेत. तर ३९ हजार ७० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे रोज नव्या रुग्णांची भर पडतच आहे. मात्र यातही कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ही संख्या दिलासादायक ठरत आहे. देशभरात मागील २४ तासात ४३ हजार ९१० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ३९ हजार ७० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ४९१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

हा देशातील कोरोना रुग्णांचा आकडा आहे. तर दुसरीकडे राज्यात मृतांचा आकडा एक लाख ३३ हजार ७१७ वर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर २.११ टक्केवर पोहचला आहे. त्यापैकी १३.७२ टक्के रुग्ण गंभीर आहेत. पुण्यासह ठाणे शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या अधिक आहे.

राज्यात कोरोनावरील उपचाराधीन रुग्णांपैकी ३२ हजार २५० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. दुसरीकडे राज्याने ४ कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णाची संख्या चिंतादायक ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या –