‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४ हजार १०३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कोरोना

पुणे : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहरात आज नव्याने ४ हजार १०३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ७३ हजार ४४६ इतकी झाली आहे. शहरातील २ हजार ०७७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ३२ हजार २६० झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात २० हजार ६८१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १४ लाख ९९ हजार ७१४ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ३५ हजार ८४९ रुग्णांपैकी ८२५ रुग्ण गंभीर तर ३,४०३ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ३३७ इतकी झाली आहे.

मागच्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तूर्तास पुण्यात लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, नागरिकांनी नियम पाळले नाही व कोरोनाचे आकडे असेच वाढत राहिले तर २ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते.

परंतु यानंतर कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सर्वांसमोर आहे. त्यामुळे आता उद्या अजित पवार नक्की कोणता निर्णय घेणार आहेत. याकडे आता सगळ्या पुणेकरांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या –