राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढील काही तासात जोरदार पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

पाऊस

मुंबई  : राज्यात मागील काही दिवसापासून पावसाने चांगलाच जोर दाराला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे . तर बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी खोल दाबामध्ये वाढल्याने रविवारी संध्याकाळपर्यंत ते चक्रीवादळात बदलण्याची शक्यता होती. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, गुलाब नावाचे हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणमपासून उत्तरेकडे २५ किलोमीटर अंतरावर धडकले.

‘गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस  शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, चंद्रपूरसह जोरदार वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आज  रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबाद आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर राज्यातील पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर पुढील काही तासात जोरदर पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर आज आणि उद्या पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिल्याची माहिती हवामान खात्याने दिली. तर बुधवारी पावसाचा जोर कमी  होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –